भुसावळातील रेल्वे कन्ट्रक्शन कार्यालयातून दुचाकी लांबवली


भुसावळ : शहरातील रेल्वेच्या कन्ट्रक्शन कार्यालयात लावलेली पल्सर मोटर सायकल चोरीला गेल्याची घटना 21 ते 25 मे या काळात घडली. य प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेत सेक्शन इंजिनीअर असलेले अनिल राजेद्र चौधरी (आदित्य रेसीडेन्सी, भुसावळ) यांनी त्यांची दुचाकी (यु.पी.94 एस.6729) 21 मे या दिवशी लावली आली मात्र 25 रोजी चोरट्यांनी ती लीांबवली. चौधरी यांच्या फिर्यादीनुसार 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार संजय कंखरे पुढील तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !