वादळी वार्‍यासह पावसाचा चिनावल परीसरातील केळीला फटका


सावदा : गुरुवार, 27 रोजी सायंकाळी लोहारा, चिनावल, विवरा, वडगाव, वाघोदा परीसरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात दुपारी तापी काठावर तर संध्याकाळी विवरा, चिनावल, लोहारा, कुंभारखेडा, वडगाव, वाघोदा शिवारात वादळाच्या प्रचंड वेगाने ऐन कापणीवर आलेल्या शेकडो हेक्टर जमिनीवरील केळी जमीनदोस्त झाली. केळी उत्पादकांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावला गेला. केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. कापणीवर असलेल्या केळीच्या उत्पन्नावर भविष्यातील शेतीचे नियोजन करणार्‍या केळी उत्पादकांना आता उत्पन्न नसल्याने शेती व नवीन केळी लागवड कशी करावी ? याची चिंता सतावत आहे. सर्वात जास्त नुकसान विवरा खुर्द शिवारात झाले आहे. नुकसानीचे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !