अज्ञात वाहनाची धडक : पतीचा मृत्यू ; पत्नीसह मुलगी गंभीर जखमी
मुक्ताईनगर : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नीसह मुलगी गंभीर जखमी झाला. हरताळा फाट्याजवळीलल हॉटेल फ्लोरासमोर हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात अमित प्रल्हाद चौधरी (36, कोथळी) यांचा जागीच मृत्यू ओढवला तर पत्नी प्रीती व तीन वर्षे वयाची लहान मुलगी लिखीता हे गंभीर जखमी झाले. दुचाकी (एम.एच. 15 एच.एफ. 9048) हे दाम्पत्य नाशिककडे निघाल्याची माहिती आहे. जखमी प्रीती व लिखीता यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




