विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा -संजय ब्राह्मणे
भुसावळ तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन : तालुक्यात भेटी-गाठी वाढवल्या
भुसावळ : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसतर्फे इच्छूक असलेले उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना भेटीप्रसंगी केले. भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी चुरस वाढली असून अद्याप कुठल्याही पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. असे असलेतरी काँग्रेसतर्फे ब्राह्मणे यांनी प्रबळ दावेदारी केली आहे शिवाय गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या त्यांनी भेटीगाठीदेखील घेतल्या आहेत.
कामाला लागा -ब्राह्मणे
मंगळवारी ब्राह्मणे यांनी फेकरी येथील भुसावळ काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व माजी सरपंच प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. प्रसंगी माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हायक्ष मो.मुन्वर खान, सुभाष झांबरे, संतोष सोनवणे, फेकरीचे उपसरपंच मेहबूब खान यांची भेट घेत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.