मुक्ताईनगरात भाजपाचे पाणीपत कधीच होणार नाही : खासदार रक्षा खडसे


रावेर : भाजपाचे नगरसेवक आमदार चंद्रकांत पाटील यांनी फोडले व भाजपाचे मुक्ताई नगरमध्ये पाणीपत झाल्याची चर्चा दोन्ही तालुक्यात जोर धरत असतांना शुक्रवारी यावर भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी भाष्य करीत भाजपा मुक्ताईनगरचा अभेद्द किल्ला असून येथे भाजपाचे कधीही पाणीपत होऊ शकणार नाही, येत्या काळात मुक्ताईनगर पंचायत समिती व जिल्हा परीषदेवर जास्तीत-जास्त जागा भाजपाच्या निवडून येतील व यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी रावेरात पत्रकारांना सांगितले.

अपात्रतेच्या भीतीपोटी ‘त्या’ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश
खासदार खडसे पुढे म्हणाल्या की, मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजपात असतांना आम्ही येथे भाजपाचे नगरसेवक निवडून आणाले होते. आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेल्याने जनतेत संभ्रम आहे की ते भाजपाचे आहे की राष्ट्रवादीचे ? त्या नगरसेवकांचे आपसात वाद होते. त्यातील चार नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात काही सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे याचिका दाखल केली असून अपात्रतेच्या भीतीपोटी ‘त्या’ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्यात सेनेचे सरकार आहे आणि या प्रवेशाने त्यांचे पद रद्द होणार नाही त्यामुळे येथे भाजपाचे पाणीपत केव्हाच होणार नाही? असे खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.

खासदारांचे होमग्राउंड असल्याचे मुक्ताईनगरला महत्व
मुक्ताईनगरात फुटलेल्या भाजपाच्या नगरसेवकांना यासाठी महत्व आहे की, येथून खासदार रक्षा खडसे या भाजपाचे प्रतिनिधीत्व करतात त्यामुळे या घडामोडीला लोकसेभत महत्व प्राप्त झाले आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूण आहे.

आगामी निवडणूकीत भाजपाच्या जागा निवडून येतील
खासदार पुढे म्हणाल्या की, मी भाजपाची खासदार आहे. आमचे पदाधिकारी देखिल जोमाने मुक्ताईनगरात काम करीत असून आमचा प्रयत्न असेल की, आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीत जास्तीत-जास्त जागा भाजपाच्या निवडून याव्यात. जळगाव जिल्ह्यात भाजपा कधीही संपणार नाही, कुणी कितीही प्रयत्न करू द्या, जिल्ह्यात भाजपा अभेद्य राहिल, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !