अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला


जळगाव : कुजलेल्या अवस्थेतील तरुणाचा जळगाव खुर्द शिवारात मृतदेह आढळला असून नशिराबाद पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. तरुणाचा मृत्यूचे ठोस कारण अद्याप कळालेले नाही. शवविच्छेदनानुसार मृत्यूचे कारण सांगता येईल, असे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.

अनोळखीचे ओळख पटवण्याचे आवाहन
नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील जळगाव खुर्द शिवारातील महामार्ग क्रमांक सहावरील मुंजोबा मंदीराजवळील, रेल्वे रूळाजवळ अंदाजे 25 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला आहे. मयत धावत्या रेल्वेतून पडला की हृदयविकाराने त्याचे निधन झाले वा अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मयताच्या हातावर इंग्रजीत एस जान, व एस एम तसेच स्टारचे चित्र गोंदलेले आहे. नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटत असल्यास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे (7588175278) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !