श्री संत मुक्ताबाई तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा घरी राहून साजरा करा : अ‍ॅड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील


मुक्ताईनगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री संत मुक्ताबाई तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा शुक्रवार, 4 जून 2021 रोजी असलातरी तो घरी राहून साजरा करण्याचे आवाहन श्री क्षेत्र कोथळीतील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे करण्यात आले आहे. श्री संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटात वैशाख कृष्ण दशमी दिनी अंतर्धान झाल्या. परंपरेनुसार दरवर्षी वैशाख दशमीला संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा होतो.

घरी सोहळा साजरा करण्याचे आवाहन
श्री संत मुक्ताबाई संस्थान, कोथळी-मुक्ताईनगर येथे यंदाही प्रातिनिधीक स्वरूपात 4 जून रोजीच समाधी सोहळा साजरा करण्यात येईल मात्र कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या घरी राहूनच अंतर्धान सोहळा साजरा करावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !