वरणगाव नगरपरीषदेला पाच कोटींचे अनुदान


स्वच्छ सर्वेक्षणात नगरपरीषद जिल्ह्यात प्रथम ; नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती

भुसावळ- स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत वरणगाव नगरपरीषदेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याने नगरपरीषदेला पाच कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर झाली आहेत तर अडीच कोटी नगरपरीषदेच्या खात्यात जमा झाल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.

नगराध्यक्षांनी बदलला शहराचा चेहरा-मोहरा
वरणगाव शहरात नगरपरीषदेच्या ठिकठिकाणी सार्वजनिक अत्याधूनिक मॉडेल शौचालयाचे बांधकाम करण्यात आले तसेच दिशादर्शक फलक लावण्यात आले,
महिला व मुलीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच वैक्तिक स्वच्छतेसाठी महिला शौचालयात पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात आले तसेच वापरलेले नॅपकीन नष्ट करण्याचे मशीनही बसवण्यात आले, सर्व शौचालयात वॉश बेसिन, हँड वॉश लिक्विड, पेपर नॅपकिन, टॉवेल, साबण, एअर फ्रेशनर, आरसा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

प्रथम क्रमांकानंतर पाच कोटींचे अनुदान
स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्यात प्रथम आलेल्या नगरपरीषदेला पाच कोटींचे अनुदान मंगळवारी जाहीर झाले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन यांचे वरगणाव नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक तसेच मुख्याधिकारी बबन तडवी, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, बांधकाम अभियंता भैय्यासाहेब पाटील, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी कुरेशी, मेहनाजबी पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, रवी सोनवणे, विष्णू खोले, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती नितीन माळी, विकिन भंगाळे, गणेश चौधरी यांनी आभार मानले आहे. दरम्यान, अभियानात आरोग्य निरीक्षक दीपक भंगाळे, गणेश तळेले, सफाई मुकदम गोकुळ भोई, सुनील तायडे, महेंद्र मोरे, गौतम इंगळे, सर्व सफाई कर्मचारी तसेच लेखाधिकारी नागरे, गुटे, प्रशासकीय अधिकारी पंकज सुर्यवंशी, सर्व वसुली विभागातील कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान, 2020 च्या अभियानात राज्यात नगरपरीषदेचा पहिला क्रमांक आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.


कॉपी करू नका.