ट्रॅक्टर दुचाकीवर आदळले : पिता-पूत्राचा मृत्यू

आई व दुसरा मुलगाही जखमी : देवपूरात ट्रॅक्टरचे चाक निखळून झाला अपघात


धुळे : भरधाव ट्रॅक्टर दुचाकीवर आदळून झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील देवपूर भाएकवीरा मंदिराजवळ शनिवारी घडली. अपघातानंतर वालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. या अपघातात हेमंत भगवान बोडरे (40) व साई हेमंत बोडरे (09, धुळे) यांचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टरचे चाक निखळल्याने झाला अपघात
हेमंत बोडरे हे पत्नी अनिता बोडरे, मुलगा साई हेमंत बोडरे (09) व मुलगा उत्कर्ष हेमंत बोडरे (सर्व रा. तिरुपतीनगर, देवपूर धुळे) सह दुचाकी (एम.एच.46 एस.14) ने जात असताना पांझरा नदी किनारी व शंभर फुटी रस्त्यावरून प्रभातनगरकडून वीर सावरकर पुतळ्याकडे जाणारे भरधाव ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.8656) चे अचानक पुढील चाक निखळून ते दुचाकीला धडकले. या अपघातात अपघातात दाम्पत्यासह दोघे मुले गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ हलवले असता उपचारादरम्यान हेमंत बोडरे व साई बोडरे या पिता-पुत्राचा मृत्यू झाला तर अनिता हेमंत बोडरे व उत्कर्ष हेमंत बोडरे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुभम सुदाम मटकर (देवपूर धुळे) या तरुणाच्या फिर्यादीनुसार अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !