निंभोर्‍याचा इसमाचा पुलावरून पडल्याने मजुराचा मृत्यू


दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील घटना ; रात्रभर पाण्यातच राहिला मृतदेह

भुसावळ : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील पुलावरून खाली पडल्याने निंभोरा येथील रहिवासी व दीपनगर केंद्रात मजूर म्हणून कामास असलेल्या 54 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गजानन आनंदा खंडारे (54, निंभोरा, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे. तालुका पोलिसांना याबाब माहिती कळताच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलिस नाईक प्रेमचंद सपकाळे, हेड कॉन्स्टेबल श्यामकुमार मोरे, विशाल विचवे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या डोक्याला मार लागून पाण्यात बुडून मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शशिकांत आनंदा खंडारे यांच्या खबरीनुसार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शामकुमार मोरे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !