भरधाव चारचाकीने उडवल्याने भुसावळचा दुचाकीस्वार गंभीर जखमी
जळगाव : भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात भुसावळचा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर चारचाकी उलटल्याने चारचाकीतील चालकही किरकोळ जखमी झाला. हा अपघात नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील मुंजोबा मंदिराजवळ सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली.
अपघातानंतर उलटले वाहन
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणारी 407 (एम.एच.19 बी.एम.4848) ने समोरून येणार्या दुचाकी (एम.एच.19 बी.डी.8641) ला धडक दिल्याने दुचाकीवरील संतोष उखर्डू कोळी (55, रा.भुसावळ) हे फेकले जावून गंभीर जखमी झाले तर दुचाकीचा चुराडा झाला तर 407 देखील उलटली.



