प्रवाशांचा अल्प प्रतिसाद ; साई नगर शिर्डी गाडी रद्द
भुसावळ : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रेल्वेने साई नगर शिर्डी गाडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 07002 सिकंदराबाद-साई नगर शिर्डी विशेष गाडी 4 ते 13 जून व गाडी क्रमांक गाडी क्रमांक 07001 साई नगर शिर्डी-सिकंदराबाद विशेष गाडी 5 ते 14 जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07207 विजयवाडा-साईनगर शिर्डी विशेष गाडी 1 ते 15 जून तसेच गाडी क्रमांक 07208 साईनगर-शिर्डी विजयवाडा विशेष गाडी 2 ते 16 जूनदरम्यान रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




