कोरोना : जिल्ह्यात तिघांचा मृत्यू तर नव्याने 157 रुग्ण आढळले


एकाच दिवसात 575 रुग्णांनी केली मात ; आज सर्वाधिक रुग्ण चाळीसगावात

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. गत 24 तासात नव्याने 157 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत दोन हजार 535 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू ओढवला तर 24 तासात 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 40 हजार 142 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 32 हजार 449 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 29
जळगाव ग्रामीण 08
भुसावळ 03
अमळनेर 04
चोपडा 02
पाचोरा 06
भडगाव 05
धरणगाव 03
यावल 05
एरंडोल 03
जामनेर 09
रावेर 03
पारोळा 04
चाळीसगाव 60
मुक्ताईनगर 00
बोदवड 12
अन्य जिल्हा 01



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !