ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट प्रकृतीची विचारणा करण्याठी : देवेंद्र फडणवीस
रावेर : कोरोना आटोपताच सत्तांतराकडे लक्ष देणार असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ज्येष्ठ नेते असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो त्यामुळे त्याला राजकीय वळण देऊ नका, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपा मराठा आरक्षण मिळण्याच्या बाजूने सरकारसोबत आहे. संभाजीराजेंनी राजकारण करू नये अन्यथा जश्यास-तसे उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.




