भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या उपाध्यक्षपदी रवींद्र दाभाडे


भुसावळ : भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या उपाध्यक्षपदी रवींद्र ओंकार दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, सरचिटणीस संदिप सुरवाडे, रमाशकंर दुबे, भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी गठीत करण्यात आले. नवनिर्वाचित उपाध्यक्षांनी येत्या काळात पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करण्याचा व त्याच प्रमाणे पक्ष संघटन मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर, सदस्य तुषार रमेश तायडे, संतोष बळवंत ठोकळ, भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष संजीवनी राहुल तायडे यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !