मुक्ताईनगरात तहसील आवारात बहुजन मुक्ती पाटीचे बोंबाबोंब आंदोलन
मुक्ताईनगर : शेतकर्यांना 50 टक्के जुन्या दरापेक्षा कमी दराने रासायनिक खते व बी-बियाणे वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे आणि भाजीपाला, फळभाज्या व फळे, शेतीची आवश्यक वस्तुंची दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात योग्य ते व्यवस्थापन देण्याची मागणी करीत मुक्ताईनगरात तहसील आवारात बहुजन मुक्ती पाटीतर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
भाजीपाला टाकला तहसील आवारात
प्रसंगी सर्व भाजीपाला तहसील कार्यालयात आणूण टाकण्यात व शेतकरी हिताच्या घोषणा देण्यात आल्या. बहुजन मुक्ती पार्टीचे रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन कररण्यात आले. प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष ब्रिजलाल इंगळे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष रमेश बोदडे, राजु वानखेडे, मुस्लिम मणियार बिरादरीचे जळगाव जिल्हाध्यक्ष हकिम चौधरी, शेख कलीम शेख मणियार, सिद्धार्थ हिरोळे व संध्य हिरोळे आदींची उपस्थिती होती.



