नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देणार


खासदार रक्षा खडसेंचे आश्‍वासन : मुक्ताईनगर तालुक्यात केली पाहणी

मुक्ताईनगर : अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व जखमी नागरीकांचे सांत्वन केले तसेच शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात-लवकर मदत मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

कर्कीत नुकसानीची केली पाहणी
तालुक्यातील कर्की येथे देखील शेती व घरांचे नुकसान झाले आहे. येथेही खासदार रक्षा खडसे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परीषद समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंके, जिल्हा परीषद सदस्य वैशाली तायडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनायक पाटील, सुनील पाटील, सोमनाथ पाटील, प्रशांत महाजन, प्रदिप साळुंके, भैय्या पाटील, प्रशांत महाजन (नायगाव), किशोर महाजन, सरपंच जावजी धनगर, रहस्य महाजन, पंकज पाटील, अतुल महाजन, पंकज महाजन, सरपंच सोपान सपकाळे, बेलसवाडी सरपंच शकील खान यांच्यासह तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी नागतिलक, कृषी अधिकारी माळी, विस्तार अधिकारी आर.एल.जैन, तलाठी गणेश जरे, तलाठी पी.आर.शिंपी, तलाठी मराठे, पोलीस पाटील शांताराम बेलदार, ग्रामसेवक विलास महाजन, ग्रामसेवक एकनाथ कोळी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !