लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही ; वळला सायकल चोरीकडे : भुसावळातील चोरटा जाळ्यात


भुसावळ : जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून सायकली चोरून कमी भावात विक्री करणार्‍या संशयीत आरोपीला शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी 8 वाजता शास्त्री टॉवर चौक येथून अटक केली. संशयित आरोपीकडून चोरीच्या 18 सायकली जप्त करण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दौलत साबळे (42, रा. खडका रोड, भुसावळ) असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव आहे. दरम्यान, संशयीत बॅण्ड पथकात असल्याची माहिती असून हाताला काम नसल्याने तो चोरीकडे वळल्याचे सांगण्यात आले.

गोपनीय माहितीवरून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.ना. प्रफुल्ल धांडे, तेजस मराठे आणि राजकुमार चव्हाण हे आज सकाळी 8 वाजता पेट्रोलिंग करत असतांना नेहरू पुतळा ते शास्त्री टॉवर चौक दरम्यान असलेल्या कॉटनकिंग दुकानासमोर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. गणेश दौलत साबळे (42, रा. खडका रोड, भुसावळ) असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची एक सायकल काढून दिली. त्यानंतर 6 चोरीच्या सायकली काढून दिल्या. अधिक कसून चौकशी तर त्याने 18 चोरीच्या सायकली काढून दिल्यात. त्याच्या खिश्यातून चाव्यांचा गुच्छा आढळून आला आहे. त्यामुळे अजून काही चोरीच्या सायकली मिळण्याच्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गिते, योगेश इंधाटे, संजय झाल्टे यांनी केली आहे. संशयित आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !