वकील संघाने जोपासले सामाजिक भान
गटविकास अधिकारी कोतवाल : रावेरला ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटरचे लोकार्पण
रावेर : रावेर वकील संघाने ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटर मशीन प्रशासनास देऊन सामाजिक भान जपण्याचे काम केले असून या ऑक्सीजन कॉन्सस्ट्रेटरमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल म्हणाल्या. रावेर येथील दिवाणी न्या.आर.एल.राठोड यांच्या संकल्पनेतून रावेर वकील संघाने व न्यायालयीन कर्मचारी यांनी निधी गोळा करून प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी न्या.आर.एल.राठोड, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, नायब तहासीलदार पवार, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन. डी.महाजन, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, रावेर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.जगदीश महाजन, सचिव धनराज ई.पाटील, अॅॅड.व्ही.पी.महाजन, अॅड.प्रवीण पासपोहे, अॅड.एस.एस.सैय्यद, अॅॅड.मधुसूदन चौधरी, अॅड.विपीन गडे, अॅड.जे.जी.पाटील, अॅड.योगेश गजरे, अॅड.गणेश अजनाडकर, अॅड. रमाकांत महाजन, अॅड.तुषार चौधरी, अॅड.के.बी.खान यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड.योगेश गजरे तर आभार अॅॅड.धनराज पाटील यांनी मानले.



