लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेषच्या फेर्‍या द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस – हावडा विशेष दि. 4 ते 29 जूनपर्यंत सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. गाडी क्रमांक 02102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष6 जून ते 1 जुलैपर्यंत सोमवार, बुधवार, गुरूवार आणि रविवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !