वरणगावात कोविड सेंटर सुरू न झाल्यास भाजपा छेडणार आंदोलन


लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त वरणगावात पीपीई किट व सॅनिटायझरचे वाटप

वरणगाव : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सरकारने सात वर्ष यशस्वी पूर्ण केल्याबद्दल भाजपातर्फे सेवा सप्ताह व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त वरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात, पोलीस स्टेशन, वीज वितरण कंपनीत, नगरपरीषदेत, सार्वजनिक कार्यालयात, बँकेत, खाजगी दवाखान्यात भाजपातर्फे पीपीई किट व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, अजय पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक, महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता पाटील-चौधरी, जयश्री अवतारे, नीता तायडे, संगीता माळी, कस्तुरा इंगळे, माजी सरपंच सुभाष धनगर, सतीश चंदने, सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष डी.के.खाटीक, माजी नगरसेविका माला मेढे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा ज्येष्ठ नेते दत्तू पंत मराठे, रमेश पालवे, सहकार आघाडीचे अध्यक्ष मिलिंद भैसे, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, डॉ.प्रवीण चांदणे, संदीप माळी, कृष्णा माळी, साबीर कुरेशी, भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर, उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, लखन माळी, गणेश चौधरी, कमलाकर मराठे, नरेंद्र बावणे, भाजपा प्रसिद्धीप्रमुख राहुल जंजाळे, वैद्यकीय अधिकारी आनंद जैन, दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती. दरम्यान, माजी नगराध्यक्ष सुनील काळे व भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी यांनी जिल्हा चिकित्सक यांना निवेदन देउन वरणगाव शहरात कोविड सेंटर सुरू करा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे पदाधिकारी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !