भुसावळात काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझर वाटप
भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्षनानाभाऊ पटोले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.संदिपभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार व प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने भुसावळ शहरातील गवळी वाडा भागात मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रदेश काँग्रेसचे योगेंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, सागर कुरेशी, राजा खान आदी उपस्थित होते.



