पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगावात शिवभोजन केंद्रावर शिवसेनेतर्फे जिलेबी वाटप
वरणगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 5 जुन रोजी दुपारी 12 वाजता येथील शिवभोजन थाळी केंद्रावर शिवसेनेतर्फे जिलेबीचे वाटप करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवार, 5 जून रोजी दुपारी 12 वाजता येथील बस स्टॅन्ड चौकातील शिवभोजन केंद्रावर शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवभोजन थाळी सोबत जिलेबीचे वाटप करण्यात आले. 150 गरीब व गरजूंना 15 किलो जिलेबीचे वाटप झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, जिल्हा उपसंघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, भुसावळ उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, निलेश ठाकूर, अब्रार खान, राहुल बावणे, सागर वंजारी, अझहर खान, भुषण बाविस्कर, अमर सोनार, रोहित मुळे, अतुल पाटील, साईचरण चौधरी, नितीन पाटील, कैलास पाटील, निलेश सुरळकर, पंकज पाटील, शिवभोजन केंद्राचे संचालक संतोष माळी यांची उपस्थित होते.


