साकरा गावातून तलवारसह आरोपी जाळ्यात
धरणगाव पोलिसांची कामगिरी : गोपनीय माहितीवरून कारवाई
धरणगाव : तालुक्यातील साकरा गावात एकाकडे तलवार असल्याची माहिती मिळाल्यावरून धरणगाव पोलिसांनी कारवाई करीत एकास अटक केली. 24 रोजी दुपारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. जुगनू भाऊराव पाटील (28, वर्ष रा.सकारा, धरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई वैभव बाविस्कर यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी जुगनूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश धरणगाव पोलिसांनी दिले होते. आरोपी जुगनू पाटील याच्या ताब्यातून लोखंडी पात्याची 32 इंच लांब व 4 इंच लांब पिवळ्या धातूची मूठ असलेली नक्षीदार कव्हर असलेली तलवार जप्त करण्यात आली.