भुसावळ इनरव्हील क्लबतर्फे परीचारीकांचा सन्मान


भुसावळ : इनरव्हील क्लब भुसावळतर्फे नगरपालिका रुग्णालयातील सेवेकरी परीचारीकांचा सन्मानपत्रख बेडशीट आणि साडी देऊन सन्मान करण्यात आला. नगरपालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, प्रकल्प असोसिएशन सीसी डॉक्टर रेशमी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी नगरपालिका रुग्णालयातील सफाई कर्मचार्‍यांंनाही सन्मानीत करण्यात आले. पास प्रेसिडेंट मनीषा तायडे यांची उपस्थिती होती. क्लब अध्यक्ष शीतल भराडे यांनी असेच समाजोपयोगी कार्य आम्ही निरंतर करीत समाज सेवा करीत राहणार असल्याची ग्वाही दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !