भुसावळात शिवराज्याभिषेक दिन साजरा
भुसावळ : मराठा समाज भुसावळ शहर आणि तालुकातर्फे रेल्वे स्टेशनजवळील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार वाहून अभिवादन करून राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठा समाजाध्यक्ष किरण पाटील, कृष्णा शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी शिक्षण सभापती तुषार पाटील, नगरसेवक राहुल बोरसे, अॅड.जास्वंदी भंडारी, सचिन पाटील, लखन जगताप, प्रवीण जगताप, वैभव गुंजाळ, रुपेश पाटील, योगेश पाटील, विजय कलापुरे, मयुर धांधले, ज्ञानेश्वर जगदाळे, अॅड.मोझे, हर्षल रंधे आदी उपस्थित होते.




