केळी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : अनिल चौधरी


रावेर : अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीला फटका बसला आहे. या भागातील केर्‍हाळे खुर्द अहिरवाडी येथे झालेल्या नुकसानीनंतर भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी रविवारी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करीत शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासनाकडे पाठपुरावा करून, लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्‍वासन चौधरी यांनी दिले.

विमा कंपनीकडे पाठपुरावा करणार
केळी पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीची भेट घेणार असून शेतकर्‍यांना भरपाई मिळेस्तोवर शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले. अनिल चौधरी म्हणाले की, माझ्या शेतकरी बांधवांनो काही अडचण आली तर खचून जाऊ नका, धीर धरा आणि माझ्याशी संपर्क साधा, मी तुमचा सेवक तुमच्यासाठी सदैव हजर आहे. या प्रसंगी माजी सरपंच राहुल पाटील, आनंद बाविस्कर, विजय पाटील, पातोंडीचे गणेश बोरसे, विकास पाटील, रमजान तडवी, रामभाऊ धनगर व शेतकरी बांधव उपस्थित होते. या दरम्यान, अनिल चौधरी यांनी दोन्ही गावांच्या नुकसानीचा आढावा घेत शेतकर्‍यांना धीर दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !