भुसावळातील भोळे महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा


भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रविवार, 6 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता शिवराज्याभिषेक दिन तसेच पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शनिवार, 5 जून रोजी प्राचार्य तथा सनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे, प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.संजय चौधरी, सुधाकर पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !