अंगावर वीज कोसळल्याने हरणखेडच्या शेतमजुराचा मृत्यू


बोदवड : अंगावर वीज कोसळून तालुक्यातील हरणखेडच्या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजता घडली. रमेश श्रावण तायडे (50) असे मयताचे नाव आहे. हरणखेडला रविवारी दुपारी विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाल्यानंतर खांबावर वीज कोसळल्यानंतर विजेची तार तुटली व ती अंगावर पडल्याने शेतमजूर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील रहिवासी असलेले शेतमजूर रमेश श्रावण तायडे हे हरणखेड येथील हिरालाल सोनटक्के यांच्या शेतात सरी पाडण्यासाठी कामावर आले असता ही दुर्घटना घडली. या प्रकरणी सुनील तायडे यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचलेल्या तायडे यांच्या नातेवाइकांची भेट घेत या कुटुंबास तत्काळ स्वरुपाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !