चुंचाळे परीसरात वीज कोसळून बैलांचा मृत्यू : पुरामुळे दुचाकी वाहिल्या


यावल : तालुक्यातील चुंचाळेसह बोराळे परीसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर गावातून जाणार्‍या नदीला 15 वर्षानंतर महापूर येवून दोघा गावांचा संपर्क तुटला तर वीज कोसळल्याने दोघा बैलांचा मृत्यू झाला तर दोन मोटरसायकल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना सोमवारी घडली.

बैलांचा मृत्यू : दोन दुचाकी वाहिल्या
यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रात्रील असलेल्या चुंचाळे व बोराळे या गाव परीसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ढगफुटी झाल्याने दोघा गावांना जोडणार्‍या नदीला सुमारे 2006 नंतर प्रथमच मोठा पूर आला. ढगफुटी व वीज कोसळल्याने बोराळे गावातील शेतकरी सुरेश प्रल्हाद धनगर यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलांचा मृत्यू ओढवला तर शेतकर्‍याचे एक लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, संजयसिंग राजपूत व रमेश पितांबर धनगर यांच्या एक लाख 30 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकलीदेखील पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चुंचाळे-बोराळे गावांच्या उत्तरेकडील असलेल्या सातपुडा पर्वताच्या जवळ असलेल्या निंबादेवी तलावाच्या परीसरात ढगफुटी झाल्याने गावातील नदीला मोठा पूर आल्याने दोघा गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !