भुसावळात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर


भुसावळ : शिवसेना उपनेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी रक्तदान शिबिराचे शिवसेना जुना सातारा विभागीय कार्यालयात आयोजन केले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, माजी आमदार दिलीप भोळे, कार्यालयीन उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललित मुथा, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, तालुका युवाअधिकारी हेमंत बर्‍हाटे, शहर युवा अधिकारी सुरज पाटील, शहर संघटक योगेश बागुल, माजी नगरसेवक कैलास लोखंडे, अ‍ॅड. नरेंद्र लोखंडे, विभागप्रमुख अमोल पाटील, अ‍ॅड.निर्मल दायमा, शाखाप्रमुख पिंटू भोई, प्रसिध्दीप्रमुख गोकुळ बाविस्कर, विक्की चव्हाण उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !