जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 106 रुग्ण आढळले ; एकाचा मृत्यू


एकाच दिवसात 261 रुग्णांची मात : मृतांची संख्या पोहोचली 2558 वर

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने घट होत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून नव्याने 106 बाधीत आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 41 हजार 209 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 36 हजार 190 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत दोन हजार 558 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी एकाच दिवशी 261 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

बुधवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे-
जळगाव शहर 26
जळगाव ग्रामीण 05
भुसावळ 07
अमळनेर 00
चोपडा 08
पाचोरा 05
भडगाव 01
धरणगाव 00
यावल 04
एरंडोल 11
जामनेर 08
रावेर 05
पारोळा 05
चाळीसगाव 16
मुक्ताईनगर 03
बोदवड 02
अन्य जिल्हा 00





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !