कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबास मदतीचा हात


भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या कर्मचार्‍यांनी जोपासली सामाजिक बांधीलकी

भुसावळ : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीतील कार्यशाळा निर्देशक स्व.भीमराव खोब्रागडे यांचा कोरोनामुळे दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी कर्मचार्‍यांनी निर्धार केल्यानंतर 70 हजारांची रक्कम जमली व या रकमेचा धनादेश तयार करून तो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांच्याहस्ते खोब्रागडे कुटुंबातील सदस्यांना देण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे, डॉ.सुधीर ओझा, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अजित चौधरी, डॉ.दिनेश पाटील, डॉ.गजानन जाधव, कार्यशाळा निर्देशक शिवाजी बरकले, संजीव नगरे उपस्थित होते.

कर्मचार्‍यांची सामाजिक बांधिलकी
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदानी एकत्रितपणे ही मदत केली. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण दर्शविले आहे. स्व. खोब्रागडे यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याच्या प्रयत्न केला असल्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !