प्रलंबित घरकुले तात्काळ पूर्ण करा : गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल
रावेर : प्रलंबित घरकुले तात्काळ पूर्ण करा बेघर लाभार्थी जागा उपलब्ध करून द्या तालुक्यातील ‘ड’च्या याद्यांचे जॉबकार्ड मॅपींग लवकर पूर्ण करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी ग्रामसेवकांना दिल्या. रावेर ग्रामीण भागातीत विविध प्रलंबीत घरकुले संदर्भात आढावा सभा घेण्याचे कामे जिल्हा परिषद गट निहाय सुरु असुन या बैठिकाला ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती होती यावेळी बीडीओ यांनी बैठकीत ड यादी आधार कार्ड मॅपीग तसेच जॉबकार्ड मॅपींग करणे ग्रामीण भागात अपूर्ण घरकुल पूर्ण करणे व शक्ती प्रदत्त समिती प्रलंबीत प्रस्ताव कामे करणे बेघर लाभार्थी जागा उपलब्ध करण देणे प्रिया सॉप्ट प्रणाली नोंदी क्लोसींग आढावा सह इतर विषयांवर ग्राम सेवकांना सूचना करण्यात आल्या यावेळी विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, सधांशु देखिल उपस्थित होते.




