लोकसहभागातून जलसंधारणाचे काम ठरले कौतुकास्पद : आमदार शिरीष चौधरी


फैजपूर : फैजपूर शहरातील धाडी नदी पात्रात जुन्या कोचुर रस्ता, खिरोदा रस्त्यावर असलेल्या फिल्टर प्लांटजवळ व परीसरातील आमोदा रस्त्यावर असलेल्या मोर नदी पत्रात उभ्या आडव्या चर खोलीकरण काम लोकसहभागातून होत आहे त्यामुळे या कामामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे यासाठी परिसरात शेतकरी बांधव एकत्र येऊन लोकसहभागातून एक चांगले काम या ठिकाणी होत आहे यासाठी शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले तर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. परीसरात लोकसहभागातून होणार्‍या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना खूप महत्वाकांक्षी असून यासाठी कोरोना परीस्थिती असताना सुध्दा असताना परिसरातील शेतकरी एकत्र येऊन एक चांगला उपक्रम राबवित आहे या कार्याचे त्यांनी कौतुक करत शासनाद्वारे जे काही मदत होईल त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !