वाढदिवसालाच तरुणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू


रावेर : घरावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. तालुक्यातील दसनूर येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. अमित उर्फ ओम पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी नवीन बांधकामावर अमित आल्यानंतर गच्चीवर उभा असतानाच विजेचा मुख्य प्रवाह असलेल्या तारांशी स्पर्ध झाल्याने विजेच्या तीव्र धक्क्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहिण आजी, काका, काकू भाऊ असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !