रुग्ण संख्या घटली : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 80 रुग्ण आढळले
एकाच दिवसात 252 रुग्णांनी केली मात ; आतापर्यंत 2559 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येसह मृत्यूदरात घट होत असून 24 तासात नव्याने 80 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला. गत 24 तासात 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत दोन हजार 559 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू ओढवला तर 24 तासात 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 41 हजार 289 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 36 हजार 443 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



