मृत शिक्षकांच्या वारसांना 50 लाखाची भरपाई द्या : प्राचार्य विनोद गायकवाड
भुसावळ : कोरोना काळात रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक, कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक आज फ्रंट लाइन वर्कर म्हणून म्हणून काम करत आहेत. प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शिक्षकांचे काही जिल्ह्यात बळी गेले आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांच्या वारसांना 50 लाखांची भरपाई देण्याची मागणी शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. विनोद गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात प्रा. गायकवाड यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन पाठविले आहे.
मदत व पुनर्वसन मंत्र्यांना निवेदन
निवेदनाचा आशय असा की, विमा कंपनी प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्कात येणार्या कर्मचार्यांना विमा संरक्षण देते. शिक्षकांनी देखील शासनाच्या निर्देशानुसार या सर्व ठिकाणी काम केले. यावेळेस काही शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्यक्ष कोरोना रुग्णांच्या संपर्कात काम करुनही विम्याचा लाभ शिक्षकांना मिळू शकत नाही. अशा प्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचे काय? असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. शासनाकडून सर्व कर्मचार्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. लस देण्याबाबत सकारात्मकता दाखवली जाते, परंतु प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोयी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे बर्याच शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. अश्या शिक्षकांच्या परिीाराला 50 लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे गायकवाड यांनी केली आहे.



