भुसावळात आरोग्य विभागातर्फे हिवताप जनजागृती


पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर केले सर्वेक्षण ; पाण्याचा अतिरीक्त साठा न करण्याचे आवाहन

भुसावळ : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून डासांची उत्पत्ती वाढते त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होऊन नागरीकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षणासह हिवताप जनजागृती केली जात आहे. तालुक्यात हिवताप जनजागृतीसाठी आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविका प्रसिध्दीपत्रके वाटप करून जनजागृती करीत आहे.

पावसाळ्यात हिवताप रुग्ण संख्येत होते वाढ
जुन महिन्याच्या सुरवातीस पावसाचे आगमन सुरू होते. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबके तयार होतात. अशा वातावरणात डासांच्या उत्पत्तीत वाढ होते. याच काळात हिवताप रूग्णसंख्येत वाढ होण्याची सुरवात होते म्हणून 1 ते 30 जुन हिवताप जनजागृती मोहिम राबविली जात आहे.



वैद्यकिय अधिकार्‍यांनी सुचविल्या उपाययोजना
या प्रसिध्दीपत्रकाद्वारे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संगीता दवंगे यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. यात घरातील दारे, खिडक्यांना बारीक जाळी बसविणे, डासांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, पाण्याच्या साठ्यांमध्ये गप्पीमासे सोडणे, पाण्याची डबकी मातीने बुजविणे किंवा वाहाती करणे, डासोत्पत्ती स्थाने रोखली गेल्याने हिवतापाचा प्रसार कमी करण्यास मदत होत असल्याचे डॉ.दवंगे यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !