यावल शहरातील 17 वर्षीय मुलाचे अपहरण


यावल : शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी 17 वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वासुदेव उमेश गैची असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. भारत गुलाब गैची (रा.श्रीराम नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या वासुदेव गैची हा बुधवारी सकाळी मित्राचा वाढदिवस असल्याने त्याच्याकडे जात असल्याचे सांगून घरून निघाला. तो सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. बुधवारी व गुरूवार दोन दिवस सर्वत्र शोध घेऊनही उपयोग न झाल्याने गुरुवारी यावल पोलिसांत त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !