अट्रावलच्या 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या


यावल : तालुक्यातील अट्रावल येथील नंदिनी कडू तायडे (18) या तरुणीने रीधूर येथे मामांकडे आल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री छताच्या हुकाला दोरी बांधून तरुणीने गळफास घेतला तर पहाटे तीन वाजेच्या सुमारास तिचे मामा झोपेतून जागे झाल्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती कळाल्यावर पोलिस पाटील प्रमोद निंबा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अनिल फेगडे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !