उदळीत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


सावदा : सावदा येथून जवळच असलेल्या उदळी बु.॥ येथे अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर शुक्रवार, 11 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पकडण्यात आल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली. चांगदेव येथील संजय भास्कर धनगर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम.एच.19 एन.4654) मधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असताना महसूल विभागाने कारवाई केली. पंचनामा करून हे ट्रॅक्टर सावदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. ही कारवाई सावदा मंडळाधिकारी बी.एम,.पवार, तलाठी एस.के.पाटील, तलाठी थोरगव्हाण एम.एच.तडवी, रायपूर तलाठी श्रीहरी कांबळे, तलाठी मस्कावद ओ.एस.मटाले, उदळी तलाठी मोमीन तडवी, गाते तलाठी चोपडे आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !