चांदणी रेल्वे स्थानक इमारतीचे काम पूर्ण
भुसावळ : मध्य रेल्वेच्या खंडवा रेल्वे स्थानकाजवळील चांदणी रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे 26 मे रोजी नुकसान झाल्यानंतर तातडीने दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात आला होता. दहा दिवसांच्या विक्रमी परीश्रमानंतर इमारत पूर्ववत उभी करण्यात आली असून मोकळ्या व्हरांड्यासह समोरील भिंतीची पुनर्रचना, प्लास्टर आणि रंगकाम काम 10 जून रोजी पूर्ण करण्यात आले.




