रावेर पंचायत समितीत ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटरचे लोकार्पण
रावेर : पंचायत समितीत ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटरचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. तालुक्यातील जिल्हा परीषद व पंचायत समिती सदस्यांनी स्वतःच्या वर्गणीतून सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना या वस्तू दिल्या आहे.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे उपस्थित होत्या. व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पंचायत समिती सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, सदस्य जितू पाटील, योगेश पाटील, पी.के.महाजन, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राजन लासुरकर सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, रमेश पाटील, बिडीओ दीपाली कोतवाल उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचे वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, सर्व विभागांचे अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व वकील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी तर प्रास्ताविक बीडीओ दीपाली कोतवाल यांनी केले.



