प्रहार संघटनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी राजश्री नेवे


उपप्रमुखपदी माया चौधरी तर सरचिटणीसपदी अनुराधा टाक

भुसावळ : प्रहार जनशक्ती पक्ष संलग्नित प्रहार शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशिय संघटनेची नुकतीच जळगाव जिल्हा महिला आघाडी गठीत झाली. संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदी येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्ष राजश्री नेवे यांची तर उपप्रमुखपदी माया चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याध्यक्ष विकास घुगे, सरचिटणीस कृष्णा बोदेले, उपाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांच्या स्वाक्षरीचे तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणीत सरचिटणीस अनुराधा दिलीपकुमार टाक, खजिनदार वंदना लिलाधर झांबरे, जिल्हा संघटक स्मिता आकाश माहुरकर, प्रसिद्धी प्रमुख कामिनी शशिकांत नेवे, उपाध्यक्षा भाग्यश्री किशोर नेवे यांचा समावेश आहे .

पदाला प्रामाणिक राहून वाटचाल : राजश्री नेवे
संघटनेच्या ध्येय-धोरणाशी आणि आपल्या पदाशी प्रामाणिक राहून यशस्वी वाटचाल करताना संघटनेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी जिल्हा आघाडी कटिबद्ध असेल, असे राजश्री नेवे यांनी सांगितले. प्रहारचे संस्थापक व प्रेरणास्थान शालेय शिक्षण राज्यमंत्री, बच्चुभाऊ कडू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवणाऱ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळवून देण्याकरीता प्रयत्न करणार आहे वरीष्ठांच्या सूचनांचे पालन करीत कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !