जळगावात पादचार्‍याचा मोबाईल लांबवला : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : शहरातील साने गुरुजी कॉलनीतील मेजर स्पोर्ट क्लब समोरून रोडवरून पायी जात असलेल्या पराग लक्ष्मीकांत सूर्यवंशी (रा.पटेल नगर, साने गुरुजी कॉलनी जवळ, जळगाव) यांचा अज्ञात आरोपी मोबाईल लांबवून पळ काढल्याची घटना 23 रोजी रात्री साडेसात वाजता घडली होती. रामानंद नगर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपीला गोपनीय माहितीद्वारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सागर सुपडु कोळी (23, वरच्या गावात साईबाबा मंदिराजवळ, किनगाव, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
आरोपीने चोरीचा मोबाईलचे लॉक तोडण्यासाठी जळगाव गाठले व गोलाणी मार्केट परीसरात तो मोबाईलला सॉप्टवेअर मारण्यासाठी विचारणा करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, प्रमोद लाडवंजारी, दादाभाऊ पाटील, परेश महाजन, दीपक शिंदे यांनी केली. गोलाणी मार्केट परिसरात रवाना केले होते. दरम्यान, आरोपीने हा मोबाईल साने गुरुजी कॉलनीतील मेजर स्पोर्ट क्लब समोरून रोडवरून पायी जाणार्‍या महिलेच्या हातातून हिसकावल्याची कबुली दिल्याने त्यास रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.