वरणगावला आपला माणुस संतोषभाऊ माळी मित्र परीवारातर्फे वृक्षारोपण


वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा क्रांतिसूर्य महात्मा फुले बहुउद्धेशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बळीराम माळी यांच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले नगरात माळी समाज पंच आणि भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संतोषभाऊ माळी मित्र परीवारातर्फे शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, निंब, करंज, आंबा, बदाम, चिंच असे एकूण 42 वृक्ष लावण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या वृक्षारोपण कार्यक्रमाला माळी समाज अध्यक्ष संजय माळी, ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष काशीनाथ माळी, पंच नाना माळी, गोविंदा माळी, रामदास माळी, भगवान माळी, सेक्रेटरी नाना माळी, वसंत माळी यांच्यासह वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद हिप्पीशेठ, जिल्हा संघटक विलास मुळे, सुभाष चौधरी, सईद मुल्लाजी, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी, मुस्लिम अन्सारी तसेच छत्रपती ग्रुपचे संदीप वाघ, प्रकाश मराठे, गोलू निंबाळकर यांच्यासह संतोषभाऊ मित्र परवारातील सचिन माळी, किरण माळी, बाळा माळी, टिनू माळी, विजय माळी, विवेक माळी, सागर माळी, पवन माळी, भैय्या माळी, भुषण माळी, निलेश माळी, दिपक माळी, मनोज माळी, किरण माळी, अक्षय माळी ईश्वर माळी, फरहाणन शेख, सीदिक खान यांच्यासाह अनेकांनी परिश्रम घेतले. वृक्षरोपणासाठी डॉ.रवींद्र माळी यांच्या कल्पतरू निसर्ग सेवा टीमने सहकार्य केले.



42 वृक्ष वाढविण्याचा घेतला संकल्प
वरणगावला आपला माणुस संतोषभाऊ माळी मित्र परीवारातर्फे वृक्षारोपणराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी आपला माणुस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परीवारातर्फे लावण्यात आलेले वृक्ष वाढविण्याचा संकल्प यावेळी संतोष माळी यांच्यासासह त्यांच्या मित्र परीवाराने केला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !