जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 77 रुग्ण आढळले ; एकाचा मृत्यू
एकाच दिवसात 187 रुग्णांनी केली मात ; आतापर्यंत 2561 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात नव्याने कोरोनाचे 77 रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला. गत 24 तासात 187 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत दोन हजार 561 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात एका रुग्णाचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 74 वर्षीय रुग्णाचा मृत्यू ओढवला तर 24 तासात 187 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 41 हजार 446 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 36 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



