सावद्यात भाजपाच्या बैठकीत शहराध्यक्षपदाची चाचपणी


सावदा : भाजपाची सावदा शहर आढावा बैठक शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झाली. या बैठकीत शहराध्य निवड, बूथरचना व संघटन या विषयावर सविस्तर व विस्तृत चर्चा करण्यात आली. डॉ.अतुल सरोदे यांनी आपले विचार मांंडताना भाजपात आलेली टिएमसीची किनार्‍यावरील मंडळी सत्ता न आल्यामुळे परत जात आहेत. पण ज्या लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी खस्ता खाल्या त्यांच्यामुळे पार्टी टिकून असल्याचे ते म्हणाले. भाजप रचनाविषयी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली.भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी बुथवरील बुथप्रमुख व त्यावरील 30 कार्यकर्ते याविषयीची पार्टी भूमिका महत्त्व पटवून सांगितले. किसान सेलचे विभाग प्रमुख सुरेश धनके व जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर, जळगाव जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी आपले विचार मांडले.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस शिवाजी पाटील, प्रल्हाद पाटील, हरलाल कोळी, महेंद्र पाटील, महेश चौधरी, नितीन कोळी, सारीका चव्हाण, माजी शहराध्यक्ष राजेश भंगाळे, माजी सरचिटणीस गजानन भार्गव, जितेंद्र भारंबे, संतोष परदेशी, विजय पाटील, अतुल ओवे, सागर चौधरी, सचिन बर्‍हाटे, अक्षय सरोदे, विनोद नेमाडे, लतेश चौधरी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान. भाजपा शहराध्यक्ष पदासाठी शहरातून पाच नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !