वरणगावातील कोव्हिड सेंटर सुरू करा


माजी नगराध्यक्ष सुनील काळे : जिल्हाधिकार्‍यांकडे भाजपाची मागणी

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता वरणगांव शहरात कोव्हिड सेंटर सुरू करावे तसेच स्त्री-पुरुष तपासणी वॉर्ड ऑपरेशन थिएटरच्या इमारत रुग्णसेवेत लोकार्पण करावी तसेच ग्रामीण रुग्णालयात ट्रामा सेंटरला मिळणार्‍या सुविधा वरणगाव ग्रामीण रुग्णालयात मिळाव्यात तसेच ऑक्सिजन प्लांट मंजूर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत व निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, भाजयुमोचे संदीप भोई, आकाश निमकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, कमलाकर मराठे यांची उपस्थिती होती. मागण्यांची पूर्तता न झाल्यास भाजपाच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !